: विवाहित प्रेयसीचे अश्लील छायाचित्र व्हायरल करणाऱ्या प्रियकराविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. किशोर मनोहर घाडगे, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.
पीडित १९ वर्षीय तरुणीचे किशोर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. यादरम्यान, त्याने तिचे अश्लील छायाचित्र काढले. डिसेंबर महिन्यात पीडित तरुणीचे अन्य एका तरुणासोबत लग्न झाले. तिने किशोर याच्यासोबत संबंध तोडले. त्यामुळे किशोर संतापला. त्याने तरुणीचे अश्लील छायाचित्र तिच्या नातेवाइकांच्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले. तरुणीला याबाबत माहिती मिळाली. तिने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून किशोर याला अटक केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times