मुंबई: ‘जेएनयू’चा विद्यार्थी आणि सध्या तुरुंगात असलेल्या शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर देशद्रोहाचा आरोप लागल्याने अडचणीत सापडलेली टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची (टिस) विद्यार्थीनी (वय २२) आज, बुधवारी अखेर आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. चौकशीचा भाग म्हणून गुरुवारी तिचा मोबाइल ताब्यात घेण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामच्या समर्थनार्थ तिनं घोषणाबाजी केली होती. त्यामुळं तिच्यावर नोंदवण्यात आला होता. हायकोर्टानं सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर आज, बुधवारी ती मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. कोर्टाच्या आदेशानुसार उर्वशी चुडावालानं आझाद मैदान पोलीस ठाण्यात आज हजेरी लावली. जवळपास तीन तास ती पोलीस ठाण्यात होती. त्या वेळेत पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला, असं पोलिसांनी सांगितलं. उद्या, गुरुवारी पुन्हा तिनं पोलीस ठाण्यात हजेरी लावल्यास तिचा जबाब नोंदवला जाणार आहे. चौकशीचा भाग म्हणून तिच्याकडील मोबाइल ताब्यात घेतला जाईल, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली.

शर्जीलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर देशद्रोहाचा आरोप लागल्याने अडचणीत सापडलेली टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची (टिस) विद्यार्थीनी उर्वशीला अखेर काल, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले होते. उर्वशीला अटक केल्यास २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला सोडावे, असे अंतरिम आदेश न्या. संदीप शिंदे यांनी पोलिसांना दिले होते. मात्र, त्याचवेळी उर्वशीला पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यासह अन्य अटीही न्यायमूर्तींनी घातल्या होत्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here