मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांना आज ब्रिच कँडी रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलेय. पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांनी त्यांना घरी आराम घेण्यास सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ( has been discharged from in mumbai today)

आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस ते आता घरी आराम करतील, असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पित्ताशयावरील शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांच्या तोंडात एक अल्सर असल्याचे दिसले होते. रविवारी २५ एप्रिलला तो अल्सर काढण्यात आला.

क्लिक करा आणि वाचा-
यापूर्वी गेल्याच महिन्यात पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढून टाकण्यात आला होता. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा ११ एप्रिल रोजी ते त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते.

सोमवारी, १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्तशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. रविवारी २५ एप्रिलला त्यांच्यावर पुन्हा एक त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या तोंडातील अल्सर काढून टाकण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here