हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत करोना व्यवस्थापनासाठी लिक्विड ऑक्सिजनच्या पुरवठा उत्तम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्सची लवकरात लवकर खरेदी करावी आणि ज्या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या अधिक आहे तिथे ते पुरवले जावेत, असे आदेश पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले. यापूर्वी केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून ७१३ पीएसए प्लांट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्वीट करून यांची माहिती दिली आहे.
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी खूप वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या अजूनही वेगाने वाढत आहे. यामुळे आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times