मुंबई: राज्यात नव्या बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ सुरूच असून गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ६६ हजार ३५८ इतकी होती. कालच्या तुलनेत आज किंचितशी घट झाली असून हा फरक ३ हजार ०४९ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६१ हजार १८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ६७ हजार ७५२ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७३ हजार ४८१ वर जाऊन पोहचली आहे. ( In Maharashtra Latest updates)

आज राज्यात एकूण ९८५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८९५ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ६१ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३७ लाख ३० हजार ७२९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४ टक्क्यांवर आले आहे.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७३ हजार ४८१ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे राज्यात सर्वाधिक १ लाख ३९७ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६७ हजार ९८४ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ७४ हजार १२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७५ हजार ३४५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ६१० इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये २२ हजार ०७७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ५३४, नांदेडमध्ये ही संख्या ९ हजार ८६९ इतकी आहे. जळगावमध्ये १३ हजार ४१८, तसेच तर रायगडमध्ये एकूण १३ हजार १७७ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ६ हजार ८७२, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ९९० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ००६ इतकी आहे.

४२,०३,५४७ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६५ लाख २७ हजार ८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४ लाख ७३ हजार ३९४ (१६.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ लाख ०३ हजार ५४७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३१ हजार १५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here