सातारा: जेव्हा पोटाला काहीच मिळणार नाही तेव्हा लोकं माणसाला मारुन खातील,असं ऐकीवात होतं,या म्हणीला तंतोतंत खरे ठरावे याची प्रचिती फलटणकरांना बघावयास मिळाली. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने पोटाची भुक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून एका मनोरुग्णाने सरणावर जळत असलेल्या अर्धवट कोविडग्रस्त मृत्यूदेहाचे लचके तोडून आपली भुक शमविण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेला पाहून मन सुन्न होत आहे. (The tried to eat the flesh of the burning corpse of )

फलटण शहरातील राव रामोशी पुलानजीक असलेल्या करोना मृतदेह अंत्यसंस्कार स्मशानभूमीमध्ये हा प्रकार घडला. हा प्रकार हा अत्यंत धक्कादायक असून तिथे पोहोचलाच कसा, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. बऱ्याच जणांनी सुरक्षा यंत्रणेची मागणी करून देखील फलटण प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप होऊ लागला आहे. हा मनोरुग्ण करोना बाधित होण्यास वेळ लागणार नाही. हा मनोरुग्ण शहरात खुलेआम फिरत असल्यामुळे इतर लोकांना संसर्ग होण्यास वेळ लागणार नाही.

या बरोबरच दुसरी बाजू देखील फलटण प्रशासन देखील एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुमारे आठ ते नऊ तास लावत आहे. मृतदेह तसेच आठ नऊ तास हॉस्पिटलमध्ये मृतदेह रॅप न करताच ठेवण्यात येत असून हॉस्पिटलमधील नर्स, डॉक्टर,स्टाफ आणि बरे होत असलेल्या रुग्णांना मृतदेहापासून संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. शिवाय नातेवाईकांनाही ताटकळत बसावे लागत आहे. ह्या प्रकरणांची सखोल चौकशी होऊन दुर्लक्ष होत असल्या कारणाने संबंधितांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे, अशी मागणी होऊ लागली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
कोळकी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले केले जात आहेत. शासनाने ही स्मशान भूमी अधिकृत केली असून नगरपालिकेचे कर्मचारी तेथे अंत्यसंस्कार करतात. नगरपालिकेला त्या स्मशानभूमीवर खर्च टाकता येत नाही किंवा रखवालदार ही नेमता येत नाही. तेथे सोई-सुविधा आणि रखवालदार नेमण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. सदरच्या वेडसर इसमाला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांकडे स्वाधीन केलेले आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
मानवी मृतदेहाचे अवयव खाणाऱ्या सदर वेडसर इसमास संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जिंती नाका येथे फलटण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून फलटण शहर पोलीससांकडे सुपूर्त केले आहे. सदर वेडसर इसमास मानवी मृतदेह खाण्याची चटक लागल्याने तो कोरोना बाधित होण्याबरोबर बाहेर राहिला तर खूप धोक्याचे ठरणार आहे त्यामुळे त्याची रवानगी कोठे करावी हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here