म. टा. प्रतिनिधी,

पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या या ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू कुपोषणामुळे झाल्याचे समोर आले आहे. तिच्या पोटोत अन्न नसल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. (The autopsy report revealed that the girl in Jalgaon died due to )

बालिकेचे वडील यांनी तीला अपशकुनी समजून गेल्या ११ वर्षांपासून तीला मारहाण केली. तिला दोन-तीन दिवस जेवण न देणे, सतत मारहाण करीत राहणे, भिंतीवर डोके आदळुन मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी पिंप्राळा हुडको परिसरात राहण्यासाठी आलेल्या तीच्या वडीलांनी बालिकेवर आणखीच अन्याय केला. तीचा मृत्यू झाल्यानंतर कोणालाही न सांगता दफनवीधी केला. तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार बालिकेचे मामा याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

क्लिक करा आणि वाचा-
त्या अनुशंगाने पोलिसांनी बुधवारी सकाळी तहसिलदारांच्या उपस्थितीत बालिकेचा मृतदेह बाहेर काढला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. वैभव सोनार यांच्यासह पथकाने या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, बालिकेच्या पोटात अन्न-पाणी नव्हते. , भुकेमुळे तीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी नोंद घेतली आहे. या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here