एकनाथ खडसे यांनी अतिशय अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिल्याचे महाजन यांचे म्हणण आहे. महाजन पुढे म्हणाले की, ‘यात खडसे साहेबांचा दोष नाही. मी यासाठी एकनाथ खडसे यांना दोष देणार नाही. कारण वाढते वय आहे, सोबत अनेक आजार आहेत आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाही. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे झाले आहे, असे मला वाटत आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. लोकांना कोण काय आहे हे सगळे माहित आहे. त्यांनी बोलत राहावे. सध्या ते अतिशय वेगळ्या मनस्थितीत आहेत. राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांना आमदारकी मिळालेली नाही. लोकांनी त्यांच्या मुलीला मतदारसंघात नाकारले आहे. त्यामुळे अशी अवस्था कुणाचीही होईल. त्या अवस्थेत ते बोलत आहेत.’
क्लिक करा आणि वाचा-
क्लिपमध्ये काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे यांना वडगाव बुद्रुक गावातील पाण्याच्या समस्येसंदर्भात एका व्यक्तीने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. हे गाव गिरीश महाजन यांच्या मतदार संघात येते. गावात पाणी नसल्याने गावातील ही व्यक्ती व्हिडिओ क्लिपमध्ये खडसेना फोन करून तक्रार करत आहे. त्यांचा हा संवाद व्हायरल झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या संवादात जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकला पाणी नाही अशी तक्रार करत असताना खडसे यावर त्याला विचारतात की, ‘कसं काय पाणी नाही तुझा आमदार कुठं मेला…का…? आमदार काय करतोय गिरीश… इकडे तिकडे बायकांमागे फिरतोय निस्ता…’आमदार फोन उचलत नाही, असं समोरील मुलगा सांगतांना खडसे पुढे म्हणतात… की, ‘पोरींचाच फोन उचलतो.’
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times