जळगाव: जिल्ह्यात संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंचा आकडाही वाढताच आहे. बुधवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यात २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत नव्याने १००६ रुग्णांची भर पडली असून त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने तो काहीसा दिलासा ठरला आहे. ( )

वाचा:

जिल्ह्यात करोना संसर्गाची स्थिती भीषण बनली आहे. दिवसभरात जळगाव शहर १७३, जळगाव ग्रामीण ४७, १३०, अमळनेर ६०, ९७, पाचोरा ४७, भडगाव ११, धरणगाव ३३, यावल २५, एरंडोल ७३, जामनेर ३८, रावेर ७०, पारोळा २०, चाळीसगाव ५०, मुक्ताईनगर ९०, बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील ७ रुग्ण असे एकूण १००६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ११२५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ९३४ इतकी झाली आहे तर १ लाख ७ हजार २६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

वाचा:

बाधित २० रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासांत २० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात यावल तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळ, यावल तालुक्यातील प्रत्येकी ३, जळगाव शहर, एरंडोल, जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी २ तर अमळनेर,चाळीसगाव, चोपडा, जळगाव, पारोळा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यात एका ४ वर्षीय बालिकेचा करोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ६ वर्षीय बालिका दगावल्याने चिंता वाढली आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गासह लहान मुलंही बाधित होत आहेत. त्यात काही ठिकाणी मूलं दगावली असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे हे नवे आव्हान ठरले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here