म. टा. प्रतिनिधी, नागपूर

हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून पेटविणाऱ्या विकेश नगराळे (वय २७) याला पोलीस बंदोबस्तात बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर चोवीस तास पाळत असणार आहे.

वर्धा कारागृहात विकेश याच्या जीवाला धोका असल्याची शक्यता लक्षात घेता वर्धा कारागृह प्रशासनाने नागपूर कारागृहात हलविण्याची विनंती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेत त्याला नागपूर कारागृहात हलविण्याचा निर्णय घेतला गेला. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्धा कारागृहात महत्वांच्या साक्षीदारांसमक्ष विकेश याची ओळख परेड घेण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात त्याला घेऊन पोलिस व कारागृहाचे जवान नागपूरकडे रवाना झाले. दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास नागपूर कारागृहात दाखल झाले. विकेश याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तो अन्य कैद्यांच्या संपर्कात येऊ नये याचीही विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मटा’ला सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here