शुभम पहिल्यापासून अतिशय हुशार म्हणून शाळेत नावाजला जायचा. घरची गरिबी असल्याने लहानपणापासून वडिलांना घरोघरी पेपर टाकण्यात मदत करायचा. वडील सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते होते. त्यामुळे पहाटे चार पासून या शुभमच्या दिवस सुरु व्हायचा. वडिलांना मदत करीत तो शिक्षण घेत होता. बारावीला चांगले मार्क मिळाल्याने त्याला कुठेही प्रवेश मिळू शकत असताना घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत पंढरपूर येथील स्वेरी इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रवेश घेत कम्प्युटर इंजिनियरिंगच्या पदवी चांगल्या गुणांनी मिळविली. या गुणांच्या जोरावर त्याला कलकत्ता येथे टीसीएस या बड्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. आता भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती.
क्लिक करा आणि वाचा-
कोरोनाच्या संकटामध्ये शुभम घरूनच कंपनीचे काम अखंड करीत होता. काही दिवसापूर्वी त्याचा विवाह निश्चित होऊन साखरपुडाही झाला. आता सगळे चांगले घडणार या स्वप्नात सोमनाथ भोसले आणि त्याचे कुटुंब असतानाच चार पाच दिवसापूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. पहिल्यांदा पंढरपूर येथेच त्याने उपचार घेतले. मात्र त्रास वाढू लागल्याने त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
क्लिक करा आणि वाचा-
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र कोरोनारूपी काळाने आज पहाटे त्याला सगळ्यातून हिरावून नेले. आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा अवघ्या २४ वर्षांचा शुभम अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेला. ज्या मुलाच्या भविष्यासाठी वडील सोमनाथ भोसले यांनी जीवापाड कष्ट केले त्यांना चांगले दिवस दिसू लागताच काळाने हा घाला घातला. शुभमच्या मृत्यूने भोसले कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times