मुंबई: मुंबईतील रुग्णसंख्येला काही प्रमाणात ब्रेक लावण्यात यश आले आहे. बुधवारी पालिका क्षेत्रात ४ हजार ९६६ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ५ हजार ३०० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले. दरम्यान, २४ तासांत आणखी ७८ रुग्ण दगावले असून मृतांचा वाढता आकडा चिंतेत भर टाकत आहे. ( )

वाचा:

मुंबईतील करोना बाधितांचा दैनंदिन आकडा ११ हजारांपर्यंत पोहचला होता. त्यात गेल्या काही दिवसांपासून मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक राहिली. २४ तासांत ४ हजार ९६६ नवीन रुग्णांची भर पडली तर ५ हजार ३०० रुग्ण बरे झाले. त्याचवेळी ७८ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता १२ हजार ९९० इतका झाला आहे. मुंबईत सध्या करोनाचे ६५ हजार ५८९ अॅक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७४ दिवसांवर गेला आहे. बुधवारी मुंबईत ३९ हजार १३५ चाचण्या घेण्यात आल्या. सध्या पालिका क्षेत्रात १२० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर १ हजार ११४ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

वाचा:

जिल्ह्यात ६५ रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आलेख वाढत असून सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये ठाणे शहरात सर्वाधिक १५ रुग्ण दगावले असून ९, नवी मुंबई ८, उल्हासनगर ४, मिरा-भाईंदर ९, अंबरनाथ ५, बदलापूर १०, ठाणे ग्रामीणमध्ये ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ७ हजार ४६६ वर गेली आहे. जिल्ह्यात दिवसभरात नवीन ३ हजार ८२० रुग्णांची वाढ झाल्याने बाधितांची एकूण संख्या ४ लाख ६० हजार ७५१ इतकी झाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here