गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या कथित क्लिपमधील संभाषणावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. वाढते वय आहे, सोबत अनेक आजार आहेत. जो माणूस मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाही. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे झाले आहे, असे मला वाटत आहे, असे महाजन यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
महाजन यांना प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले की, गिरीशभाऊंना मी आत्ता ओळखत नाही आहे. सन १९९४-९५ मध्ये फर्दापूरला अशाच प्रकारची घटना घडली होती. तो संपूर्ण इतिहास मला माहिती आहे. मलाच नाही, तर साऱ्या जनतेलाही माहिती आहे.
क्लिक करा आणि वाचा-
गिरीश महाजनांनी हांजी-हांजी करुन सर्व मिळवले- खडसे
जो माणूस मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाही, या गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर खडसे म्हणाले की, ‘मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे गैर आहे असे मला वाटत नाही. मी तरी मुख्यमंत्रिपदापर्यंत गेलो. तुम्ही तर तिथपर्यंतही जाऊ शकले नाहीत. हांजी-हांजी करून तुम्हाला हे सगळे मिळाले आहे. मी स्वकर्तृत्वाने सगळे मिळवले आहे.’
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times