मुंबई: विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सुलभ करण्याची केंद्राचीही मानसिकता आहे आणि आमचीही आहे. पण त्यासाठी नियोजन करणे हे काम राज्य सरकारचे आहे. मुंबईत एक ते दीड लाख लशी उपलब्ध आहेत. असे असतानाही मुंबईतील ४० ते ५० केंद्रे बंद होती. आता तरी यामध्ये राजकारण करू नका. केंद्र सरकारसोबत समन्वयातून लस उपलब्ध करून घेऊन जनतेचे लसीकरण निश्चित वेळेत व्हायला हवे. ते फार लांबणे जनतेच्या जीविताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. (stop politics now even with says )

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दरेकरण पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘निश्चित वेळेत लसीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसे न झाल्यास अनेक संकटाला सामोरे जावे लागू शकते. तसे झाले तर ते आपल्याला परवडणारे नाही. जास्तीत जास्त लशी उपलब्ध करून घेणे, तसेच केंद्र सरकारशी वाद न करता समन्वय ठेवणे, खासगी पातळीवर जास्तीत जास्त लशी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. तसेच १ मेपासूनच उत्तम लसीकरण करण्याची गरज देखील आहे. कारण ६ महिने हा खूप मोठा कालावधी आहे. त्यामुळे युद्धपातळीवर लस उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांवर मोफत लस देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, त्यासोबतच लसींचा साठा अपुरा असल्यामुळे १ मे पासून राज्यात या वयोगटासाठी लसीकरण सुरू करता येणार नाही, अशी देखील माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे आता या मुद्द्यावरून विरोधक राज्य सरकारला आपल्या टीकेचे लक्ष्य करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
लसीकरणामध्ये राजकारण न आणता आपण राजकारणाच्या पलीकडे लसीकरणाची मोहीम राबवायला हवी. विरोधी पक्ष देखील यासाठी सरकारला पाठिंबाच देईल. एकीकडे मोफत लस जाहीर करायची, दुसरीकडे लस अपुरी आहे असेही सांगायचे, हे योग्य नसल्याचे दरेकर म्हणाले. लस उपलब्ध झाली नाही तर लसीकरण केंद्र सुरू करणार नाही, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणाले. पण जशी लस उपलब्ध होईल, तशी केंद्रे सुरू झाली पाहिजेत. लशीचा अपेक्षित साठा आला, तरच केंद्रे सुरू करू, अशी भूमिका घेणे जनतेवर अन्याय करणे होईल, असे दरेकर पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here