बेंगळुरूः कर्नाटक सरकारने राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या ( ) पार्श्वभूमीर एक मोठी घोषणा केली आहे. करोनाने मृत्यू वाढत असल्याने कर्नाटक सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. बेंगळुरू बाहेरील २३० एकर २५ गुंठे जमीन कर्नाटक सरकारने अंत्यविधीसाठी दिली आहे. ही जमीन तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली आहे.
दरम्यान, कर्नाटकात राजधानी बेंगळुरू ही आता करोना उद्रेकाची केंद्र बनली आहे. राज्यात बुधवारी ३९०४७ इतके करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २२ हजारांहून अधिक रुग्ण हे बेंगळुरूमधील आहेत. मंगळवारी ३१ हजारांहून अधिक करोनाचे रुग्ण आढळून आले होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नागरिकांना करोना नियमांचे कडक पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात बुधवारपासून १४ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times