‘करोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सातत्याने केंद्राकडे करत आहेत. मग ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये असेल किंवा पत्राद्वारे. हे राष्ट्रीय संकट आहे हे जगानंही मान्य केलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयानेही करोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. करोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट अॅक्टिव्ह झालं आहे. करोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना गेला आहे. कोर्ट झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल,’ अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.
‘करोनाचे संकट वाढत आहे. देशातील जनता दहशतीखाली आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं खूप काम करण्यात आलं आतापर्यंत महाराष्ट्र या संकटाशी सामना करतोय त्याची दखल सर्वांना घ्यावीच लागेल. हे महाराष्ट्र मॉडेल आहे ते वापरुन देशाला महामारीशी लढावंच लागेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times