पंकजा मुंडे यांनी आज सकाळी एक ट्वीट करत त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. ‘माझा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून विलगीकरणात होते. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळं मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यात वेळी कदाचित मला करोनाचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळं या काळात जे कोणी माझ्या संपर्कात जे आले आहेत त्यांनी स्वतःची करोना चाचणी करुन घ्यावी, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटनंतर धनजंय मुंडे यांनी त्यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंची पोस्ट
पंकजाताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केला, यामुळं होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करुन घ्या. मोठा भाऊ म्हणून मी आपल्या सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times