अहमदनगर: एका बाजूला करोनाचा कहर, त्यासाठी आवश्यक असलेला पैसा आणि दुसरीकडे या कठीण काळात सुरू असलेले नव्या संसद भवनाचे बांधकाम, यापैकी प्राधान्य कशाला द्यायचे याचा फेरविचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले आहे.

देशभरात करोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकारने नव्या संसद भवनाच्या इमारतीचे हजारो कोटी रुपयांचे काम सुरू ठेवले आहे. दिल्लीत कडक लॉकडाउन असतानाही हे काम बंद पडू नये, यासाठी मजुरांचा जीव धोक्यात घालून कोविड नियमांकडे दुर्लक्ष करीत मजुरांची वाहतूक केली जात आहे. देश आर्थिक अडचणीत असतानाही सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. यावर काँग्रेससह विविध पक्षांनी टीका केली आहे.

वाचा:

यावर आता पवार यांनीही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य पाहून त्यानुसार प्राथमिकता ठरवावी लागते. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे, याचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे. करोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचं संपूर्ण लसीकरण करणं ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी रुपयांचा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडं केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही.’

वाचा:

या प्रकल्पाचे काम सुरू झाले, तेव्हापासून देशात करोनाची परिस्थिती गंभीर आहे. या महामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी पैशांची गरज आहे. सर्वच राज्ये केंद्राच्या मदतीकडे डोळे लावून बसली आहेत. इतर देशही मदतीसाठी हात पुढे करीत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने हजारो कोटी रुपये खर्चाचे हे काम सुरूच ठेवले आहे. त्यावरून सुरुवातीपासूनच टीका सुरू आहे. आता दिल्लीत करोनाची परिस्थिती गंभीर बनली असताना तेथे काम करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाही काम सुरूच ठेवल्याबद्दल पुन्हा टीकेचा जोर वाढला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here