मुंबई: राज्यातील राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणात पोलीस निरीक्षक यांना अलीकडेच अटक करण्यात आली आहे. माने यांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष भाजप अधिकच आक्रमक झाला असून पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. सुनील माने यांच्या शिवसेनेच्या नेत्यांशी जवळचे संबंध असून त्यांच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार यांनी केली आहे.

माने यांचे बरेच नातेवाईक हे शिवसेनेत सक्रिय आहेत. त्यांची बहीण व त्या बहिणीचे पती हे शिवसेनेचे नगरसेवक होते, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. भातखळकर यांनी या संदर्भात एनआयए महासंचालकांना पत्र लिहिलं असून चौकशीची मागणी केली आहे.

वाचा:

मनसुख हिरेन यांना तावडे या नावाने कॉल करून घराबाहेर बोलविल्याचा सुनील माने यांच्यावर आरोप आहे. माने यांची बहीण ही मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथून नगरसेविका होती तर सुनील माने यांच्या त्या बहिणीचे पती हे शिवसेनेचे चार वेळा नगरसेवक होते. इतकंच नव्हे, माने यांचा सख्खा भाऊ व त्यावेळी नगरसेवक असलेले त्याच्या बहिणीचे पती यांनी पत्रा चाळीतील नागरिकांना घरे रिकामी करण्यासाठी दमदाटीही केली होती. त्यात सुनील माने यांचा सुद्धा सहभाग होता. पीएमसी बँक घोटाळ्यात ज्या शिवसेना नेत्यांना कर्जे मिळाली त्यांच्याशी देखील सुनील माने यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळं मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करताना माने यांच्या शिवसेना कनेक्शनची सुद्धा चौकशी होऊन ‘दूध का दूध, और पाणी का पाणी’ होण्याची आवश्यकता आहे, असं भातखळकर यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here