अमरावती: ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून, आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यास बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चोरी केलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीने मध्य प्रदेशातूनही दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे.

चोरीची दुचाकी घेऊन तरूण केदार चौकात उभा असल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी वरूड येथील राहुल सुरजुसे (वय २९) याला अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस दुचाकी चोरट्यांच्या मागावरच आहेत. अशातच राहुल हा काळ्या रंगाची दुचाकी घेऊन केदार चौकात उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर पोलीस पथक तात्काळ केदार चौकात पोहोचले. त्यांनी राहुलजवळ दुचाकीबाबत विचारणा केली. त्यावर ही दुचाकी नगरपरिषद कॉम्प्लेक्स वरूड येथून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याची कसून चौकशी केली असता, आणखी तीन दुचाकीही चोरल्याचे त्याने सांगितले. तसेच मध्य प्रदेशातूनही दुचाकी चोरल्याचे अधिक चौकशी केली असता उघड झाले. त्यांनी आरोपीकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज सूसतकर, दीपक सोनाळेकर, युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, अमित वानखडे, नितेश डोंगरे यांच्या पथकाने केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here