म.टा. प्रतिनिधी,

अहमदनगरचे खासदार डॉ. यांनी दिल्लीहून रेमडेसिवीर आणून वाटल्याच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात वेगळेच वळण आले आहे. आज झालेल्या सुनावणीच्यावेळी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यामध्ये म्हटले आहे की, विखे पाटील हॉस्पिटलच्या मेडीकल स्टोअरकडून मिळालेल्या पैशातून जिल्हा शल्यचिकित्सकांनी १७०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुण्यातील एका कंपनीतून आणली. त्यातील काही साठा विखे पाटील मेडीकल स्टोअरला देण्यात आला. यावर न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले असून त्यावर सविस्तर अहवाल ३ मे रोजी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच शिर्डी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचा आदेश दिला आहे. (remedesivir injection for vikhen was brought from pune district collector put report in the high court)

अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणून अहमदनगरला वाटप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने हा अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विखे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. दिल्ली येथून शिर्डी येथे आणलेला साठा पुण्यातून खरेदी केलेल्या साठ्या व्यतिरिक्त आहे का? डॉ. विखे यांनी विमानातून इंजेक्शनचा साठा आणताना, वाटताना स्वतः काढलेले व्हिडिओ व फोटो खरे आहेत का ? या सर्व गोष्टी तपासणे गरजेचे आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

जोपर्यंत याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत योग्य पुरावा मिळत नाही, तोपर्यंत पुढील आदेश देणे संयुक्तिक वाटत नाही. यावर सरकारी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी मुदत मागवून घेतली. न्यायालयाने त्यांना तीन मेपर्यंत मुदत दिली. दरम्यान शिर्डी विमानतळावरील १० एप्रिल ते २५ एप्रिल या काळातील खासगी विमानांतून आलेल्या मालाचे सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवावे, असा आदेश न्यायालयाने राज्याच्या गृहसचिवांना दिला आहे.

नगरचे सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे व बी. यू. देबडवार यांच्यासमोर यावर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. सतीश तळेकर, ऍड. प्रज्ञा तळेकर व ऍड. अजिंक्य काळे काम पहात आहेत, तर सरकारच्या वतीने ऍड. डी. आर. काळे काम पाहात आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
गुरूवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी याचिकाकर्त्यांनी शपथपत्रद्वारे बातम्यांची कात्रणे दाखल केली. त्यामधून निदर्शनास आणून दिले की, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. विखे यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन १७०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जिल्हा रुग्णालयाला दिला आहे. त्यावर सरकारी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सादर करून ती इंजेक्शन पुण्यातून आणल्याचे सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
या याचिकेत सामील होण्यासाठी काही रुग्णांच्या वतीने दाखल करण्यात आलेले हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळले. पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here