सोलापूर: माणदेशाची शान आणि भूषण समजला जाणारा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात हिंद केसरी म्हणून ओळखला जाणारा सर्जा मेंढ्याचे न्यूमोनियाच्या आजाराने आज गुरुवारी निधन झाले. ( who was known as and hindkesri)

सांगोला तालुक्यातील चांदोलवाडी येथील पारंपरिक मेंढपाळ आणि व्यवसायिक बाबू बापू मेटकरी यांचा हा मेंढा होता. अजस्त्र देहयष्टी, अतिशय देखणे रूप असलेला हा सर्जा माडग्याळ जातीचा अडीच वर्षाचा नर होता. सर्जाचे नाक हे त्याचे मुख्य सौंदर्याचे लक्षण होते. राघूच्या नकाप्रमाणे असणारे याचे नाक हे त्याचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. गेल्या तीन चार दिवसांपासून सर्जाला न्युमोनिया या आजाराने ग्रासले होते.

सर्जाला वाचवण्यासाठी मालक बाबू मेटकरी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसंगी उपचारासाठी पशुवैद्यकीय डॉक्टराकडे दाखल करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही.आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता सर्जाने मेटकरी कुटुंबियांचा अखेरचा निरोप घेतला. हा मेंढा दीड वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यासह समाज माध्यमावर चर्चेत आला होता.कारण एकच मेंढ्याला लोकांनी २७ लाख रूपयांपर्यंत बोली लावली होती, मात्र बाबू मेटकरी यांनी एक कोटी रूपये दिले तरी मेंढा देणार नाही अशी भूमिका घेतली होती.

क्लिक करा आणि वाचा-
मेटकरी यांच्याकडे सध्या माडग्याळ जातीच्या लहान-मोठ्या ५० मेंढ्या आहेत.या मेंढ्यावर त्यांनी आपली दहा एकर शेती बागायती केली आहे.सर्जा हा आमच्या घरातील एक महत्त्वाचा सदस्य होता.”आम्ही त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होतो, त्याच्या जाण्याने आमचा एक सदस्य गमावला आहे” अशी प्रतिक्रिया बाबू मेटकरी यांनी मटा ऑनलाइनशी बोलताना दिली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here