नवी दिल्लीः मरगळ झटकून बाहेर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला महागाईने झटका दिला आहे. महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी बुधवारी जाहीर झाल्यानंतर सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. घाऊक बाजारात ७.५९ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या सहा वर्षांतला महागाईचा हा उच्चांक आहे. सलग सहावा महिन्यात हा महागाई दर वाढला आहे.

घाऊक बाजारात डिसेंबर २०१९मध्ये महागाई दर ७.३५ टक्के होता. जानेवारीत महागाई दर ४ टक्क्यांच्यावर होती. जानेवारीत भाजीपाल्यातील महागाई ५०.१९ टक्क्यांवर तर डिसेंबरमध्ये २०१९मध्ये हा आकला ६०.५० टक्के होता. डाळी आणि डाळींशी संबंधित उत्पादनांमध्ये १६.७१ टक्के महागाई होती.

उद्योगांच्या वेग घसरला

डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाचा वेग कमी झाल्याचे समोर आले आहे. डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन ०.३ टक्क्यांनी घसरले. गेल्या वर्षी याच काळात २.५ टक्के वाढ दिसून आली होती. वस्तूंचे उत्पादन घटल्याने ही घसरण झालीय.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरमध्ये औद्योगिक विकास ०.५ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षी याच काळात या क्षेत्रात ५.७ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here