बाळापूर तालुक्यात लॉकडाऊनमध्ये खनिजाचे उत्खनन मोठ्या जोमाने सुरु असून तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम सोनाळा येथील पूर्णा नदीपात्रातही मातीचे उत्खनन सुरू आहे. या उत्खनानादरम्यान मोहम्मद कुरेशी याच्या अंगावर दरड कोसळल्यामुळे त्याच्या डोक्यात जबर मार लागला आणि त्याचा जागीच मुत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या मजुरांची नावे समजू शकलेली नाहीत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेत मृत पावलेला मजूर कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असल्याने त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
लॉकडाऊनमुळे काम उपलब्ध नसल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर. काहींचे काम बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मागील काही दिवसापासून हे मजूर उत्खनानाच्या कामावर जात आहेत. याच्या पाठीमागे त्याच्या परिवारात अहमद याला चार मुले, पत्नी असून घरातील कमविता माणसाचे दुर्दैवी निधन झाल्याने या परिवारावर संकट कोसळले आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे .या घटनेचा बाळापूर आणि उरळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
बाळापूर तालुक्यात गौण खनिज उत्खनन जोरात चालू असून या लॉकडाऊनमधे त्या कामावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. परिसरातील कोणत्याही रेती, माती घाटाचे लिलाव झाले नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. त्यामुळे दुसरीकडे अवैध उत्खनन वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र रात्री-बेरात्री उत्खनन सुरू असल्याने अशा घटना घडून त्यामध्ये मजुराचा नाहक बळी जात आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना तालुक्यात घडलेल्या आहेत. परंतु , शासनाने त्यावर कोणतेही पाऊल उचलेले नाही. जर रेती, माती घाटाचे लिलाव झाले तर हे अवैध गौण खनिज उत्खनन थांबेल आणि त्यामुळे मजुरांचे बळी जाणार नाहीत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times