वाचा:
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील कोविड केअर युनिटला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी फडणवीस यांनी करोना रुग्णांची संख्या, औषधांचा साठा, बेड्स, ऑक्सिजन पुरवठा तसेच मोहीम याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून तपशीलवार माहिती घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लशींची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांना लससाठा मिळायला हवा. तसे झाल्यास तुटवडा भासणार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून मागणी करणार आहे असे, असे फडणवीस म्हणाले. केंद्राकडून महाराष्ट्राला लशीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या आरोपांवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीच सांगितल्यानुसार, महाराष्ट्राने सर्वात जास्त लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे केंद्राकडून लस पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण करण्यात काही तथ्य नसल्याचे फडणवीस म्हणाले.
वाचा:
अमरावती जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला व संपूर्ण विभागातील करोनाची परिस्थिती जाणून घेतली. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टरांशी देखील संवाद साधत त्यांच्याकडून घडत असलेल्या रुग्णसेवेचे कौतुक केले. यावेळी अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, आमदार रवी राणा, सभागृह नेते तुषार भारतीय, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, दिनेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times