मुंबई: राज्यात संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असतानाच काही महिन्यांच्या अंतराने करोनाची तिसरी लाटही राज्यात धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री यांनीच माहिती दिली असून जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात राज्यात येवू शकते. या लाटेचा सामना करण्यासाठी आपण आतापासूनच सज्ज व्हायला हवे, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्री यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत, असे टोपे यांनी नमूद केले. ( )

वाचा:

राज्यात सध्या करोना संसर्गाची भीषण स्थिती पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला जात आहे. दररोज ६० ते ६८ हजारांच्या दरम्यान नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णालयांत आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक रुग्णांचा अभावी मृत्यूही झाला आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.

वाचा:

राज्यात करोनाची तिसरी लाट जुलै किंवा ऑगस्टमध्ये येवू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ही भीती लक्षात घेता ही लाट येण्याआधी आपण आवश्यक पावले टाकायला हवीत. प्रामुख्याने ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध असेल यासाठी नियोजन केले गेले पाहिजे. आपल्याकडे पुरेसा ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या लाटेत ऐकून घेतले जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेवून आतापासूनच पावले टाकावीत. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट उभारला गेला पाहिजे. आता जी धावपळ चालली आहे ती तिसऱ्या लाटेत दिसता नये, अशी सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे टोपे यांनी नमूद केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here