नवी दिल्लीः ‘डायमंड प्रिन्सेस’ या जहाजावरील करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जपानच्या योकोहामाच्या किनाऱ्यावर हे जहाज गेल्या काही दिवसांपासून उभे आहे. या जहाजावर ३, ७११ प्रवासी आहेत. यापैकी १३८ भारतीय आहेत. या क्रूझवर असलेल्या दोन भारतीयांना करोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. दोघांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जपानमधील भारतीय दुतावासाने स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीला दुजोरा दिला आहे. यामुळे जहाजावरील १७४ प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

१९ फेब्रुवारीला संपणार १४ दिवसांचा अवधी

‘डायमंड प्रिन्सेस’ हे क्रूझ गेल्या आठवड्यात जपानच्या योकोहामाच्या किनाऱ्यावर आले होते. पण गेल्या महिन्यात हाँगकाँगला गेलेल्या एका प्रवाशाला करोना व्हायरसची लागण झाल्याने ही क्रूझ तिथेच उभी करण्यात आली आहे. क्रूझमधील एकाही प्रवाशाला जपानमध्ये उतरू दिले जात नाहीए. त्यांना १४ दिवसांपर्यंत रोखण्यात आलंय. १४ दिवसांचा हा अवधी १९ फेब्रुवारीला संपणार आहे.

काही प्रवाशांना करोना व्हायरसची लागण झाल्याने हे जहाज १९ फेब्रुवारीपर्यंत किनाऱ्यावरच रोखण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय दुतावासाने दिलीय. या जहाजात असलेल्या भारतीयांनी सुटकेसाठी व्हिडिओद्वारे संदेश पाठवलाय. यासंदेशात त्यांनी पंतप्रधान मोदींना वाचवण्याची विनंतीही केलीय.

सरकारने केली तयारी

भारतात दाखल होणाऱ्या विमानांमधील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. विमानांमध्ये घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत दिली माहिती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here