करोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतरच्या वर्षानंतर माउंट मेरोनवर झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम होता. करोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्यानंतर या कार्यक्रमासाठी १० हजारांहून अधिकजणांनी या बोनफायर फेस्टिवलसाठी हजेरी लावली होती.
वाचा:
ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा ज्यू धर्मियांसाठी जगातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. हे एक वार्षिक तीर्थस्थळ आहे. हजारोजणांनी या वार्षिक उत्सवासाठी हजेरी लावली होती. दुसऱ्या शतकातील संत संत रब्बी शिमोन बार योचाई यांचे या ठिकाणी समाधीस्थळ आहे. बोनफायर फेस्टिवलमध्ये रात्रभर प्रार्थना आणि नृत्य सादर केले जात होते. माउंट मेरेन स्टेडिअममध्ये आसन व्यवस्था कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
वाचा:
या दुर्घटनेत ३८ जण ठार झाले असून मृतांची संख्या अधिक असणाऱ्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती समजताच इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनीदेखील घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. तर, दुसरीकडे मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले. या उत्सवासाठी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी या भागात प्रवेश बंदी लागू केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times