मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा दर ७० डॉलरच्या दिशेने कूच करत आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज सलग १५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.

आज मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. ८७.८१ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाने ७१ डॉलर प्रती बॅरलपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावला होता. तब्बल १६ वेळा कंपन्यांनी इंधन दरवाढ केली होती.

दरम्यान, अमेरिकन अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे. नुकताच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर देखील स्थिर ठेवण्यात आले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला फटका बसला असला तरी त्याचा फार मोठा परिणाम इंधन मागणीवर झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे सध्या इंधन दरात तेजी दिसून येत आहे.

अमेरिकी बाजारात गुरुवारी ब्रेंट क्रूडचा भाव १.०९ डॉलरची वृद्धी झाली. ब्रेंट क्रूडचा भाव ६८.३० डॉलर झाला. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.०८ डॉलरच्या तेजीसह ६४.७३ डॉलर प्रती बॅरल झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here