साओ पाउलो: जगभरातील देशांमध्ये करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. भारतात करोनाची दुसरी लाट आली असताना ब्राझीलमध्ये ही करोनाचे थैमान सुरू आहे. ब्राझीलमध्ये एकाच महिन्यात तब्बल एक लाख बळींची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये आता एकूण करोना बळींची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. जगात सर्वाधिक करोना बळींची नोंद अमेरिकेत झाली असून ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमधील परिस्थिती आणखी चिघळणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ब्राझीलमध्ये महासाथीच्या आजारामुळे एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांमध्ये चार हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यात ब्राझीलमध्ये दररोज सरासरी २४०० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी तीन हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

वाचा:
ब्राझीलमध्ये करोना संसर्गाची आणखी एक लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. बाधितांची आणि मृतांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना आखाव्या लागतील असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. ब्राझीलने करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.

वाचा:

दरम्यान, ब्राझीलच्या सिनेटने महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने आखलेल्या उपाययोजनांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमुळे राष्ट्रपती बोल्सनारो यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे म्हटले जाते. बोल्सनारो यांनी प्रभावीपणे उपाययोजना न आखल्यामुळे ब्राझीलमध्ये करोनाचे थैमान सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here