वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक घटना आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा वाघ नेमका कुठे आढळलाय याबाबत वनविभागाने कोणतीही माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. वन विभागाचे मुख्य वनरक्षक डॉ. क्लेमेंट व्ही बेन, कोल्हापूर यांनी केलेलं ट्विट हे वाघाच्या अस्थित्वाबाबत दुजोरा देणारे आहे. यामुळे आता सिंधुदुर्गाच्या जंगलातून वाघाचा संचार असल्याचा भक्कम पुरावा वन विभागाला मिळालेला आहे.
५ जानेवारी २०२० रोजी उत्तर गोव्यातल्या म्हादई अभयारण्याच्या जवळ असलेल्या गोळवली गावात मृत वाघाचे अवशेष मिळाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे गोवा आणि देशभरातल्या वन्यजीव प्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली होती. गोवा वनविभागाने तपास सुरु केला असता केवळ एकच नाही तर तब्बल चार वाघांच्या मृत शरीरांचे अवशेष तपास पथकाला त्यावेळी आढळून आले होते. यात एक मादी आणि तीन पिल्लांचा समावेश होता. मिळालेल्या या चारही वाघांवर विषप्रयोग झाल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला होता. त्यामध्ये साधारण आठवडाभर 2019 च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घटना घडली होती या प्रकरणात चार जणाना अटकही त्यावेळी झाली होती .
क्लिक करा आणि वाचा-
सन २०१५ आणि २०१६ पासून सिंधुदुर्गात नर, मादी आणि तीन पिल्ले अशा पाच जणांचे भ्रमण वेळोवेळी वनविभागाच्या कॅमेऱ्यात दिसलेले आहे.
म्हादई अभयारण्यात या कुटुंबावर विषप्रयोग व्हायच्याआधी मार्च २०१८ मध्ये चांदोलीत वनविभागाच्या कॅमेऱ्यात हाच वाघ दिसला होता. त्यानंतर २४ मार्च २०२१ रोजी हाच वाघ म्हादई अभयारण्यातून पुढे सरकताना वनविभागाच्या कॅमेऱ्यात आढळून आला होता.
क्लिक करा आणि वाचा-
आज केमेऱ्यात भक्षासह दिसलेला हा वाघ त्याची भ्रमंती ही कर्नाटकातल्या दांडेली अभयारण्याचा परिसर, उत्तर गोव्यातलं म्हादई अभयारण्य, विशाळगड, राधानगरी, तिलारी, जोरजांभळी, महाबळेश्वर असा मोठा भ्रमणमार्ग या वाघाचा असल्याचे वेळोवेळी वन विभागाच्या कॅमेऱ्यात दिसून आले आहे. म्हणूनच तिलारी अभयातण्यातून पुढे चांदोलीकडे सरकताना हा वाघ सिंधुदुर्ग वनविभागाच्या कॅमेऱ्यात टिपला गेलाय. तो वाघ गोव्यातील म्हादईतील त्या पाच जणांच्या कुटुंबातीलच आहे का, हे वन विभागाने संशोधन करणे आवश्यक आहे. मात्र वाघाचे वन विभागाच्या केमेऱ्यातील दर्शन सुखद आहे व वन प्रेमींसाठी ते निश्चितच आनंददायी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times