पुणे: काँग्रेस नेते व राज्यसभा सदस्य यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे, अशी माहिती येथील जहांगीर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक यांनी आज दिली. राज्याचे सहकार राज्यमंत्री हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. ( )

वाचा:
खासदार राजीव सातव यांना संसर्गाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. सत्यजीत सिंग गिल आणि डॉ. कदम यांनी आज पत्रकार परिषदेत सातव यांच्या प्रकृतीची माहिती दिली. सातव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत गुरुवारी संध्याकाळपासून सुधारणा होत आहे. त्यांना शंभर टक्के कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता होती. ती आता ४५ टक्क्यांवर आली आहे. ते लवकरच बरे होतील आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील, असा विश्वास यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

वाचा:

दरम्यान, राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून कोविडची लक्षणे दिसत होती. त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी करून घेतली. त्यानंतर २२ एप्रिल रोजी चाचणीचा अहवाल आला आणि ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली होती. माझा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून सौम्य लक्षणे आहेत. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी जे कोविडबाबतचे निर्देश आहेत त्यांचे पालन करावे, असे आवाहन सातव यांनी या ट्वीटमध्ये केले होते. त्यानंतर २३ एप्रिल रोजी सातव हे जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र, २५ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून डॉक्टरांची टीम सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. कोविडच्या अनुषंगाने आवश्यक सर्व इलाज केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांनीही रुग्णालयात फोन करून सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे व उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सातत्याने रुग्णालय व्यवस्थापनाच्या संपर्कात असून गुरुवारीही कदम यांनी रुग्णालयात जावून सातव यांच्या तब्येतीचे अपडेट्स घेतले होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here