महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून या पूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे याची आम्हाला जाणीव आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्याचा तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला साहाय्य करण्यास कटीबद्ध आहे. म्हणूनच करोनासोबत लढण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहोत, असे पक्षाने जाहीर केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लशीचा खर्च परवडणार आहे अशा नागिराकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी. त्यामुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times