म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

‘करोनाच्या दुसऱ्य लाटेत परिस्थिती गंभीर होण्यास आपल्या सर्वांचा गाफीलपणा जबाबदार आहे. पहिल्या लाटेनंतर आपण आवश्यक ती काळजी घेतली नाही, उपाययोजनाही केल्या नाहीत. आता तिसरी लाट येणार आहे म्हणतात. त्यावेळीही आपण या उपाययोजना करू शकलो नाही, तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो, असेच म्हणावे लागले,’ अशी कबुली नगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांनी दिली. (the negligence of all of us is responsible for the situation getting worse in the says minister )

मंत्री मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये आढावा बैठका घेतल्या. उपाययोजनांची माहिती देऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाला सूचना केल्या. पुढील पंधरा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुश्रीफ म्हणाले, ‘करोनाच्या पहिल्या लाटेनंतर मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम झाले. लोकांची गर्दी वाढली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढला. त्यामुळे यंत्रणांवर ताण आला. नागरिकांनी आता स्वताच्या आणि इतरांच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे. विनाकारण बाहेर पडणारे नागरिक संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे आता गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करुन रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले गेले पाहिजे. करोनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामदक्षता समिती आणि प्रभाग समित्यांनी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांबाबत कडक धोरण अवलंबले होते. आता तीच पद्धत अवलंबली गेली तरच संसर्गाला आळा बसू शकेल. पुढील १५ दिवस अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने आणि दूध वगळता इतर व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी आणि या दोन लाटांचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देत मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने जिल्हा नियोजन ऩिधीतील ३० टक्के रक्कम कोविड उपाययोजनांसाठी उपयोगात आणण्याची परवानगी दिली आहे.’

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, रोहित पवार, लहू कानडे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, , महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, पोलीस उप अधीक्षक प्रांजल सोनवणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here