म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे अंडरवल्डशी संबंध होते, ही पुढे आलेली बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना केली. (underworld relationship of should be investigated says rural development minister )

नगरमध्ये आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, शंभर कोटी रुपयांच्या संबधी आरोप झाले म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी होते. मात्र, ज्या परमविर सिंह यांच्या संदर्भामध्ये एक हजार कोटी रुपयांचा आरोप होतो, अकोला येथे गुन्हा दाखल होतो, त्यांची मात्र चौकशी होत नाही. एका पोलीस अधिकाऱ्यांने दोन दिवसापूर्वी तक्रार केली त्यामध्ये त्यांनी परमवीर सिंग यांचे गुन्हेगारीशी संबंध होते, असे म्हटले आहे म्हणून आता या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी तात्काळ केली पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
ग्रामविकासमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरमध्ये आज आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करोनावर देखील भाष्य केले. करोनाच्या दुसऱ्य लाटेत परिस्थिती गंभीर होण्यास आपल्या सर्वांचा गाफीलपणा जबाबदार आहे असे ते म्हणाले. पहिल्या लाटेनंतर आपण आवश्यक ती काळजी घेतली नाही आणि उपाययोजनाही केल्या नाहीत. आता तर तिसरी लाट येणार आहे म्हणतात. त्यावेळीही आपण या उपाययोजना करू शकलो नाही, तर राज्य चालविण्यास अपयशी ठरलो, असेच म्हणावे लागले, असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
या बैठकीत उपाययोजनांची माहिती देऊन त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाला सूचना देखील केल्या. पुढील पंधरा दिवस कडक लॉकडाऊन पाळा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here