मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ सुरूच असली तरी आज निदान झालेल्या नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आजही अधिक आहे. यामुळे राज्याला सलग दुसऱ्या दिवशी काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६२ हजार ९१९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ६९ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ६८ हजार ५३७ इतकी होती. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ६६ हजार १५९ इतकी होती. कालच्या तुलनेत आज घट झाली असून हा फरक ३ हजार २४० इतका आहे. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ६२ हजार ६४० वर जाऊन पोहचली आहे. ( maharashtra registered 62919 new cases in a day with 69710 patients recovered and 828 deaths today)

आज राज्यात एकूण ८२८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ७७१ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ६९ हजार ७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३८ लाख ६८ हजार ९७६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०६ टक्क्यांवर आले आहे.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ६२ हजार ६४० इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे राज्यात सर्वाधिक १ लाख ६ हजार ०१९ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ६५ हजार ६७० इतका खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ५० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७८ हजार ६१४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ५४८ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये २० हजार ४२७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ३७२, नांदेडमध्ये ही संख्या ८ हजार ९६३ इतकी आहे. जळगावमध्ये १२ हजार ४६३, तसेच तर रायगडमध्ये एकूण १३ हजार ८९६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ७ हजार १३४, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार ५५३ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ८३४ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

४१,९३,६८६ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७१ लाख ०६ हजार २८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६ लाख ०२ हजार ४७२ (१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१ लाख ९३ हजार ६८६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २६ हजार ४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here