बुलडाणा: एकीकडे बाधित रुग्णांची संख्या नवे उच्चांक गाठत आहे तर दुसरीकडे राज्यात इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. यांच्या जिल्ह्यातही रेमडेसिवीर इंजेक्शन गरजू रुग्णांसाठी उपलब्ध होत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळेच शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातच करोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसह रयत क्रांती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन द्या’ अशी मागणी लावून धरत अडीच तास ठिय्या आंदोलन केले. ( )

वाचा:

बुलडाणा जिल्ह्यात मोठया प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. अधिक पैसे मोजण्याची तयारी असणाऱ्यांनाच इंजेक्शन उपलब्ध होत आहे मात्र, सामान्यांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे अशी मागणी करत रुग्णांच्या नातेवाईकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तेव्हा अधिकाऱ्यांनी सर्वांचीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. त्यातून अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दुपारी साडेतीन वाजतापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलकांनी कार्यालयात ठिय्या दिला होता. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी बुलडाणा पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर रेमडेसिवीरबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

वाचा:

दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन वाटप हे रुग्णाला रुग्णालयात उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अशोक बरडे यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here