वाचा:
विकास नगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित वार्तालाप प्रसंगी देशमुख बोलत होते. सोलापूरचे पाणी नेणार नाही, असा शब्द पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. त्यांनी तो शब्द पाळावा. उजनीच्या पाण्यासाठी आणि सोलापूर अशी लढाई करण्याचा प्रश्नच नाही. ज्याच्या हक्काचे पाणी आहे त्यालाच ते मिळाले पाहिजे. सत्तेचा कोणीही दुरूपयोग करू नये. सत्ता जात येत असते. भरणे हे इंदापूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी इंदापूरसाठी नक्की झटावे. मात्र त्यांच्याकडे सोलापूरचे पालकत्वही दिलेले आहे. त्यामुळे सोलापूरचे पाणी हिसकावून नेणे त्यांना न शोभणारे आहे. त्यांनी पाणी पळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. जनआंदोलन उभारू, अधिवेशनात आवाज उठवू मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांना उजनीचे पाणी इंदापूरला नेऊ देणार नाही, असे आमदार देशमुख म्हणाले.
वाचा:
करोना संसर्गाबाबत बोलताना देशमुख म्हणाले की, हे जगावर, देशावर आलेले संकट आहे. सर्वांनी एकत्र येऊन त्यासाठी लढले पाहिजे. केंद्र सरकार आपल्यापरीने मदत करत आहेत. राज्य सरकारनेही त्यांचे काम करावे. केंद्राकडून जास्तीज जास्त लससाठा महाराष्ट्राला झाला आहे, त्यामुळेच राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. उगाच कोणी विरोधाला विरोध म्हणून राजकारण करू नये. १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना लस देण्याचे नियोजन आहे. सर्वांनी यात सहभाग नोंदवावा. लस घेतल्याने करोनाच्या महामारीला थोडाफार अटकाव येणार आहे. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि सोलापुरातून करोनाला हद्दपार करावे, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.
औषध, लस पुरवठ्याबाबत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय
केंद्राने औषध, लस, इंजेक्शनचा साठा राज्याला दिला आहे. राज्याने विभागाला दिला आहे. आपला जिल्हा पुणे विभागात येतो. तेथूनच सोलापूर शहर आणि जिल्ह्याला लस, औषधे देण्यात अन्याय होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अशा संकटाच्या काळात राजकारण करणे बरोबर नसल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. सोलापूरला जास्तीत जास्त लस मिळाव्या यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
दक्षिणच्या गावांसाठी सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी
सध्या उजनीचे पाणी भीमा सीना जोड कालव्यातून सीना नदीत सोडले आहे. हे पाणी तिर्हेण बंधाऱ्यापर्यंत आले आहे. मात्र दोन- तीन आठवडे झाले तरी हे पाणी अजून दक्षिण तालुक्यातील गावांना मिळालेले नाही. येथील अधिकाऱ्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून पाणी दक्षिणच्या गावांना सोडावे, येथील अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. लवकर पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times