पटोले मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारने करोनाची स्थिती निष्काळजीपणे हाताळल्याचेही ते म्हणाले. सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही, ‘देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का?’, असा संतप्त सवाल केल्याचेही ते म्हणाले. आज राज्यात अनेक गावे स्मशान झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे, असे पटोले म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोरगरीब कुटुंबाना दत्तक घ्यावे- पटोले
राज्यासमोर आर्थिक संकट आहे. असे असतानाही महाविकास आघाडी सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण (Covid vaccination) करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला यात मदत व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजारच्या गोरगरीब कुटुंबांना दत्तक घ्यावे आणि स्वतःचा, तसेच त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, असे आवाहन पटोले यांनी केले.
क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेस आमदारांनी दिले एक महिन्याचे वेतन
कोरोना हे देशावर आणि राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट असून दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या पहावत नाही. या संकटाचा सामना राज्य सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत असल्याचे सांगत केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असल्याचे ते म्हणाले. असे असले तरी महाराष्ट्र सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे असे पटोले म्हणाले. काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली असल्याचेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times