वाचा:
महाराष्ट्रातील सरकार टिकणार नाही आणि येत्या डिसेंबर महिन्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, असं भाकित भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच वर्तवलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ‘विरोधी पक्षाने त्यांच्या भूमिका जोरकसपणे मांडायला हव्यात. पण आम्हाला कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करू असे वारंवार सांगणे हे मोदी यांच्या पक्षाला शोभणारे नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप असा नव्हता,’ असा चिमटा काढण्यात आला आहे.
वाचा:
वाचा:
अग्रलेखातील ठळक मुद्दे:
>> राज्यातील नवी घडी भाजपला मान्य नाही. बहुमताची सरकारे दाबदबावाने अस्थिर करायची व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात अराजकाची चूड लावायची हे तंत्र अघोरी आहे. त्यांनी धमकी दिलीच आहे. आता कृती करून दाखवावी.
वाचा:
>> चंद्रकांत पाटील यांचे भाकीत हे रस्त्यावरील पोपटवाल्याचे भविष्य आहे, अशी खिल्ली काही मंडळींनी उडवली. पण हा खिल्ली उडवण्याचा विषय नसून गांभीर्याने घ्यावा असा विषय आहे. डिसेंबरमध्ये निवडणुका होणार असे चंद्रकांत पाटील छातीठोकपणे सांगतात ते कुणाच्या भरवशावर आणि इशाऱ्यावर. मुळात पाटील जे सांगतात ती गर्भित धमकी आहे.
>> भाजपने कितीही तीर मारले तरी माशाचा डावा डोळा काही घायाळ होणार नाही. त्यामुळं एक प्रकारची निराशा येणं स्वाभाविक आहे. मग हे सरकार कसे पाडायचे व मुदतपूर्व निवडणुका कधी घ्यायच्या यावर एखादे कारस्थान शिजवले जात आहे काय? पाटलांच्या बोलण्यातून तेच दिसते.
>> डिसेंबरमध्ये मुदतपूर्व निवडणुका घ्यायच्या असं भाजपच्या अंतःस्थ गोटात ठरवलंच असेल तर त्यांना आधी संसदीय लोकशाहीचा गळा घोटावा लागेल व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसावा लागेल. राज्यपालांना हाताशी धरून गृहखात्याच्या माध्यमातून त्यांना हे सरकार ‘बेइमानी’ करून बरखास्त करावे लागेल. त्यासाठी थातुरमातूर कारणे शोधावी लागतील. हे ‘पाप’ करण्याचा प्रयत्न ते जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही.
>> डिसेंबरमध्ये महाराष्ट्राचे सरकार पडेल या स्वप्नातून ते पुढच्या २४ तासांतच दचकून जागे होतील. कारण दिल्ली विधानसभेत भाजपचा पुन्हा दारुण पराभव झाला आहे. आधी दिल्ली जिंकण्याचे बघा, मग महाराष्ट्राकडे वाकडय़ा नजरेने पहा.
>> पाटील यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलं आहे व त्यातून त्यांचे इशारे व धमक्या सुरू आहेत. अर्थात दिल्लीनं मार्गदर्शन केल्याशिवाय पाटील असे इशारे देणार नाहीत. पुन्हा पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत. पुन्हा सत्ता आल्याखेरीज दिल्लीत जाणार नाही असे फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे पाटलांनाच सांगितले.
>> सरकार फार काळ चालणार नाही वगैरे भविष्य पाटील यांच्याप्रमाणे फडणवीस यांनीही मध्यंतरी सांगितले. हे सरकार स्वतःच्याच बोजाने पडेल, असे फडणवीस सांगतात. ते बरोबर आहे. कारण त्यांचे सरकार पंक्चर झाले ते स्वतःच्याच बोजामुळे. त्यांच्या सरकारने महाराष्ट्राचे ओझ्याचे आणि बोजाचे गाढव केले होते. नवे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची घोडदौड रेसच्या घोड्याप्रमाणे सुरू आहे व गाढवांनाही थोडा आराम मिळाला आहे.
>> बहुमताची सरकारे दाबदबावाने अस्थिर करायची व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात अराजकाची चूड लावायची हे तंत्र अघोरी आहे. त्यांनी धमकी दिलीच आहे. आता कृती करून दाखवावी.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times