पुणे: सध्या संपूर्ण जगासोबतच संपूर्ण भारत हा करोनासारख्या महासाथीशी लढा देत आहे. या लढ्यात अनेकजण स्वतःला झोकून देत काम असून, वाढत्या रुग्णाची संख्या आणि अपुरी पडत असलेली आरोग्य व्यवस्थेसाठी अनेक स्तरांतून मदतीचा हात पुढे येत आहेत. अनेक सेवा भावी संस्था, स्वयंसेवक यामध्ये सामील झालेले आहेत. या सगळ्यात अनेक तरुण सुद्धा पुढे येत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ”. ( a young man from made his own house a kovidam isolation center)

कराटे स्कुलचा साहाय्यक मुख्याधिकारी असलेला श्रीश चंद्रने स्वतःच्या घराला कोविड आयसोलेशन केंद्रात बदललं आहे. त्याच पुण्यातील राहतं घर त्याने कोविडच्या काळात लोकांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. सध्याची परिस्थिती पाहता अनेकांना लागणारी मदत आणि त्या मदतीत आपला खारीचा वाटा असावा म्हणून त्याने आपल्या २ बीएचके फ्लॅटला कोविडच्या रुग्णांना मोफत देण्याचा निर्णय घेतला.

श्रीशलाही झाली होती करोनाची लागण

आयसोलेशन सेंटरची कमतरता तसेच अनेकांना क्वॉरटाईनसाठी वेळेवर योग्य अशी जागा मिळत नाही आणि ती लोकांना मिळावी हा त्याचा मुख्य हेतू आहे. या आयसोलेशन सेंटरमध्ये त्याने कोविड रुग्णांना हवी ती सगळी सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. श्रीश हा स्वतः एक कोविड रुग्ण होता आणि त्यांनी त्यावर योग्य औषध उपचार आणि योग्य आहाराने मात केली आहे. ऑक्सिमीटर, बीपी मीटर, बेड, औषध, थर्मोमीटर या सगळ्याचा यात समावेश असून श्रीशने याची सुरुवात आपल्या मैत्रिणीपासूनच केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

अडणींवर केली मात

सलोनी कांबळे या मैत्रिणीला त्याने पहिल्यांदा अशी सुविधा देत पुढे ही सुविधा सर्व सामान्यासाठी सुद्धा त्याने चालू ठेवायचे ठरवले. सुरुवातीला काही अडचणी आल्या. पण त्यावर मात करत त्याने हे कार्य चालू ठेवले आहे. या आयसोलेशन सेंटर मध्ये एकाच वेळी ४ जण राहू शकतात.

क्लिक करा आणि वाचा-
आपल्या सगळ्यांची परिस्थिती बिकट आहे पण यासगळ्यावर आपल्याला मात करायची आहे. माझा या सगळ्यापाठी एकच उद्देश आहे की अनेकांनी अशा वेळेत पुढे येऊन मदतीसाठी पुढे यावं. माझ्या या कार्याला मला सुरुवातीला काहींचा विरोध होता पण आपल्या या कार्याने अनेकांना होणारी मदत पाहता तो लवकरच मावळला, असे श्रीश चंद्र याने सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here