लंडन : करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीने आता उद्योजकांच्या मनात धडकी भरवली आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेत वापरल्या जाणाऱ्या कोव्हीशील्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स येत असल्याचा धक्कादायक दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (serum institute) सीईओ अदर पुनावाला ( adar poonawalla) यांनी केला आहे. पुनावाला सध्या लंडनमध्ये आहेत.

कोव्हीशील्ड लसींची निर्मिती करणाऱ्या पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्युटवर सध्या प्रचंड ताण आहे. पुण्यात या लसींची निर्मिती होत आहे. मात्र त्या तुलनेत देशातून लसींना मोठी मागणी आहे. याबाबत अदर पुनावाला यांना भारतातून बड्या नेत्यांचे, काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे तसेच उद्योजकांकडून लसींच्या मागणीसाठी फोन केले जात आहे.

यू.के ‘दि टाईम्स’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी या फोन कॉल्सचा उल्लेख केला आहे. कोव्हीशील्ड तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी आपल्याला धमक्यांसारखे फोन येत असल्याचे पुनावाला यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. सीरमकडून भारतीयांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. कोव्हीशील्डला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे असे आक्रमक फोन कॉल्स गंभीर आहेत. प्रत्येकाला लस तातडीने हवी आहे. मात्र त्यांना हे कळत नाही तर इतर कोणी आपल्याही आधी त्यांना लस पुरवू शकतो का, असे पुनावाला यांनी म्हटलं आहे.

फोनवर काहींची भाषा ही धमकावणारी असल्याचा दावा पुनावाला यांनी केला आहे. लस दिली नाहीस तर चांगले होणार नाही. ही चुकीची भाषा नाही तर एकप्रकारे मला दिलेला इशारा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

यू.केने भारतीयांवरील प्रवेशबंदी लावण्याच्या आधी अदर पुनावाला यांनी लंडन गाठले होते. आपण लंडनमध्येच आणखी काही काळ राहू, असे पुनावाला यांनी म्हटलं आहे. आपल्याला पुन्हा त्या भीषण परिस्थितीमध्ये परत जायचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सगळी जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याचं दाखवले जात पण आपण एकटे काही करू शकत नाही , अशी व्यथा त्यांनी मांडली.

… तर इतर देशांमध्ये उत्पादन करण्याचे संकेत लस उत्पादन इतर देशांमध्ये विस्तरण्याचा पुनावाला यांचा विचार आहे. त्यादृष्टीने येत्या काही दिवसांत मोठी घोषणा करू, असे पुनावाला यांनी या मुलाखतीत सांगितले.भारतात सध्या उत्पादन सुरु आहे मात्र ब्रिटनमध्ये उत्पादन सुरु करण्याचे संकेत पुनावाला यांनी दिले आहेत.

नुकताच पुनावाला यांची सुरक्षा वाढवण्यात आली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (serum institute) सीईओ अदर पुनावाला ( adar poonawalla ) यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पुनावाला यांच्या जीवाला असलेल्या धोका पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने ( home ministry ) यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आदेशानुसार सीआरपीएफची सुरक्षा त्यांना दिली जाणार आहे.

आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण पण लसींचा तुटवडादेशात करोनाविरोधातील लढाईत केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या लसीकरण मोहीमेचा तिसरा टप्पा आता १ मेपासून सुरू होतोय. आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार आहे. मात्र देशात निर्माण झाला असून अनेक शहरांमध्ये लसीअभावी लसीकरण बंद आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here