याबाबत सविस्तर माहिती अशी की , शनिवारी सावळी येथील तीन व कवडा (ता. जिंतूर) येथील दोन अशा एकूण पाच नागरिकांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना या पाच रुग्णांनी कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊ पळ काढला. याबाबत आरोग्य विभागाने पोलिसात तक्रार दिली आहे.
औरंगाबादमध्ये १७ मृत्यू, ११३४ नवे करोनाबाधित, मृतांमध्ये ३२ ते ८२ वयोगटातील बाधितांचा समावेश
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ ते ८२ वयोगटातील १७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण करोनाबळींची संख्या २५२९ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात शनिवारी (१ मे) ११३४ (शहरः ४८२, ग्रामीणः ६५२) नवे बाधित आढळून आल्याने आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या एक लाख २५ हजार ३४१ झाली आहे. तसेच शनिवारी जिल्ह्यातील १४४५ बाधित (शहरः ६१२, ग्रामीणः ८३३) हे करोनामुक्त झाल्याने आतापर्यंतच्या एकूण मुक्त व्यक्तींची संख्या एक लाख ११ हजार १४५ झाली आहे व सध्या ११,६६७ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ग्रामीण भागात ६५२ बाधित
ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये इटखेडा येथील ४, चितेगाव २, सिल्लोड ४, गंगापूर ६, कन्नड १, पैठण १, तिसगाव १, पिपंळवाडी १, वडगाव २, बजाजनगर ६, वाळूज ३, सिडको महानगर- एक येथे २, घाणेगाव १ व इतर ६१८ बाधितांचा समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times