मुंबई: राज्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्हयांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले. ( for year started in the state)

आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्हयांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्हयांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठयानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.

नाशिकमध्ये २७६ जणांनी घेतली लस

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एकूण पाच केंद्रांवर २७६ जणांनी लस घेतली. यापैकी १८५ जण नाशिक शहरातील आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. १ मे अखेर जिल्ह्यात ६५ हजार ६८८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर २९ हजार ७२ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. म्हणजेच २९ हजार ७२ आरोग्यकर्मींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय ५७ हजार ९०९ फ्रंटलाईन वर्कर्सने पहिला डोस तर २१ हजार ९७६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

नागपूरमध्ये रविवारी दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण

नागपूर शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी रविवारी २ मे रोजी मनपाच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here