वाचा-
दक्षिण अमेरिकेतील प्रादेशिक फुटबॉल फेडरेशनचे कोन्मेबोल यांनी दिलेल्या माहितीनुसार लिओनेल मेस्सी आणि नेमार हे दिग्गज खेळाडू चीनच्या सिनोव्हॅक बायोटेक कंपनीने तयार केलेली करोनाची लस घेणार आहेत. या फुटबॉल फेडरेशनने त्याचे सदस्य असलेल्या १० संघटनांना लस देण्याचे सुरू केले आहे. याद्वारे दक्षिण अमेरिकेतील काही हजार फुटबॉलपटूंना लस दिली जाणार आहे.
वाचा-
वाचा-
गुरुवारी उरुग्वेची राजधानी मॉन्टेविडीया येथे ५० हजार डोस दिले जाणार आहेत. दक्षिण अमेरिकेतील खेळाडूंना ही लस दिल्यानंतर येथील सर्वात मोठी अशी कोपा अमेरिका या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
वाचा-
गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये अन्य स्पर्धांप्रमाणेच कोपा अमेरिकेचा ४७वा हंगाम करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times