आज पाच विधानसभा निवडणुकींचा निकाल आहे. यात तामिळनाडू आणि केरळचाही निकाल लागणार आहे. तामिळनाडूत सत्ताबदल होण्याचा अंदाज एग्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तर केरळमध्ये डाव्यांची सत्ता कायम राहील, असं एग्झिटमध्ये म्हटलं आहे. आता आज निकाल लागणार आहेत. वाचा निकालासंबंधीचे सर्व अपडेट्स…

– केरळमध्ये माकप ४७ जागांवर आघाडीवर, तर काँग्रेसची जोरदार मुसंडी, ४१ जागांवर आघाडी. भाकपही ९ जागांवर पुढे

– तामिळनाडूत डीएमके ६ जागांवर, तर एआयएडीएमके २ जागांवर आघाडीवर

– केरळमध्ये इडुकीत पोस्टल मतांच्या मोजणीला सुरवात

– तामिळनाडू आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरवात

– केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांची विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुथुपल्ली चर्चमध्ये प्रार्थना

– केरळच्या तिरुवनंतपूरममद्ये मतमोजणीसाठी मतपेट्या बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू

– विधानसभा निवडणुकांच्या निकालासाठी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू होईल

– तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागा आहेत. तिथे सध्या एआयएडीएमके सत्तेत आहे. बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे.

– एग्झिट पोलच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये यावेळी सत्ताबदल होण्याची दाट शक्यता आहे. डीएमके सत्तेत येण्याची शक्यता आहे. यामुळे डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन हे चर्चेत आहेत.

– केरळमध्ये डाव्यापक्षांची सत्ता आहे. पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत. केरळमध्ये सत्ताबदल होणार नाही, असा अंदाज एग्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here