नवी दिल्ली : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होतोय. मतदानानंतर समोर आलेल्या जनमत चाचणीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून आलं. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, १, ६, १०, १७, २२ आणि २६ एप्रिल रोजी नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय.
LIVE अपडेट
- पानीहाटी (उत्तर २४ परगणा) मधील कॉंग्रेसचे उमेदवार तपस मजुमदार यांचे मतगणना एजंट गोपाळ सोम हे मतमोजणी केंद्रावरच बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं
- नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत
- सकाळी ९.३० वाजता तृणमूल १०७ जागांवर तर भाजप १०१ जागांवर आघाडीवर
- मतमोजणीत सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेस आघाडीवर
- पश्चिम बंगालमध्येसकाळी ८.०० वाजता मतमोजणीला सुरुवात
- पश्चिम बंगालचा निकाल हा भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरतेय.
- राज्यातील निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक जनसभांना संबोधित केलं. तसंच करोना संक्रमण काळातही रस्त्यांवर रॅली आयोजित करण्यात आल्या होत्या.
- तर दुसरीडे राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही ही निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचं रान केलं. एका रॅलीदरम्यान जखमी झाल्यानंतरही व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times