राज्यात तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. १२६ विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजपने निवडणुकीत पूर्ण ताकद पणाला लावली होती. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात तीन टप्प्यांत घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ८२.०४ टक्के मतदान झाले आहे.
एक्झिट पोलच्या दाव्यानुसार, आसाम निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होऊ शकते. यूपीए आघाडी सत्ताधारी भाजप प्रणित एनडीएच्या जवळ पोहोचताना दिसत आहे. टाइम्स नाऊ/ एबीपी न्यज-सी व्होटर एक्झिट पोलनुसार, बहुमत मिळवण्यासाठी एनडीएला आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, असे भाकित होते.
आसाम विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे म्हटले जात होते. त्यात अपक्ष आणि अन्य आमदार हे निर्णायक ठरू शकतात. या निवडणूक रणांगणात प्रणित यूपीए लढत असून, एनडीएने राज्यात विकासाचे आश्वासन दिले होते. आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान झाले आहे. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. मागील वेळी २०१६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १२६ पैकी ८६ जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला २६ जागांवर समाधान मानावे लागले होते. याशिवाय एआययूडीफला १३ एजीपीला १४, बीपीएफला १२ आणि अन्य एका जागेवर विजय मिळाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times