मुंबई– कित्येक दशकं बॉलिवूडवर राज्य केलेले दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. आरोग्य संबंधित काही तक्रारी उदभवल्याने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. परंतु, अजूनही ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं सायरा यांनी सांगितलं.

दिलीप कुमार ९८ वर्षांचे असून सायरा कायम त्यांची काळजी घेत असतात. दिलीप कुमार यांच्या आरोग्याची प्रत्येक महिन्याला तपासणी केली जाते. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. परंतु, आता त्यांची तब्येत स्थिर आहे. सायरा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, त्यांची तब्येत आता स्थिर आहे आणि पहिल्यापेक्षा उत्तम आहे. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांना लवकरच घरी पाठवण्यात येईल. काळजी करण्याचं काही कारण नाही.’ दिलीप कुमार सोशल मीडियावर सक्रिय असतात मात्र करोनामुळे त्यांनी सोशल मीडियाचा वापर कमी केला होता.

दिलीप कुमार यांनी करोनाकाळात ट्विट करून सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी ट्विट करत म्हटलं, ‘मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतोय आणि अशी आशा करतोय की सगळे या संकटावर लवकरात लवकर मात करू.’ त्यांनी २६ मार्च रोजी शेवटचं ट्विट केलं होतं. जेव्हा करोनाच्या पहिल्या लाटेला सुरुवात झाली होती तेव्हा सायरा यांनी दिलीप कुमार यांना आयसोलेट केलं होतं. तेव्हापासून त्या दिलीप कुमार यांची जास्त काळजी घेत आहेत. मागितलं वर्षी करोनामुळे दिलीप कुमार यांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला नव्हता. सायरा यांनी दरवर्षीप्रमाणे काही गरजू व्यक्तींना दान केलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here