बीजिंग: महासाथीच्या काळात अनेक देशांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले होते. आता जगातील अनेक देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी असल्याने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. चीनमध्ये ही करोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर लोकांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. याच दरम्यान, निरोधच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, रेकिट बेंकिजर या कंपनीने म्हटले की, चीनमध्ये त्यांच्या ‘ड्युरेक्स’ निरोधाची विक्री १२ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. लॉकडाउन आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांमध्ये जसजशी शिथिलता येईल त्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनांची विक्री अधिक वाढेल असे कंपनीने म्हटले.

वाचा:

मागील वर्षी विक्रीत झाली होती घट

ड्युरेक्स निरोधचे उत्पादन करणाऱ्या रेकिट बेंकिजरने सांगितले की, मागील वर्षी महासाथीमुळे निरोधच्या विक्रीत १२ टक्के घट झाली होती. केवळ चीनच नव्हे तर अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्येही निरोध विक्रीत वाढ झाली आहे.

वाचा:


सेक्स टॉईजना मागणी

करोना महासाथीच्या काळात चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या सेक्स टॉईजची मागणी जगभरात ३० टक्क्यांनी वाढली होती. चीनमध्ये सेक्स टॉईजचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. चीनच्या शॅडोंगमधील सेक्स टॉइजची निर्मिती करणारी कंपनी लिबो टेक्नोलॉजीचे परदेशातील सेल्स मॅनेजर वायलेट डू यांनी सांगितले की लॉकडाउननंतर सेक्स टॉईजची मागणी वाढल्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागली.

वाचा:

डू यांनी सांगितले की, फ्रान्स, अमेरिका, इटलीतून मोठ्या प्रमाणावर अधिक ऑर्डर मिळत आहेत. लवकरात लवकर ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी आमचेप्रयत्न सुरू आहेत. चीनमध्ये लॉकडाउन व इतर निर्बंधाच्या काळात देशांतर्गत मागणीत घट नोंदवण्यात आली होती .

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here